मुंबई । शिवसेना (ठाकरे गटाचे) रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, उपतालुकाप्रमुख गणपत म्हात्रे, नागोठणे विभागप्रमुख संजय भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष मधुकर पाटील, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे तसेच प्रदेश प्रवक्ते राजीव साबळे उपस्थित होते.
किशोर जैन यांच्यासोबत माजी सरपंच मिलिंद धात्रक, माजी सरपंच संतोष नागोठणेकर, मोहन नागोठणेकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल महाडीक, कळसुरेचे माजी सरपंच भालचंद्र शिर्के, ग्रामपंचायत सदस्य अजगर मुल्ला, सचिन ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य अॅड. प्रकाश कांबळी, शाखाप्रमुख धनंजय जगताप, असलम शेख, संजय काकडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.