मुरुड नगरपरिषदेत सत्तांतर , राष्ट्रवादीच्या अनुराधा दांडेकर थेट नगराध्यक्ष

24 Dec 2025 20:14:47
 murud
 
मुरुड । नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुराधा मंगेश दांडेकर यांनी 245 मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे. अनुराधा दांडेकर यांना एकूण 4 हजार 194 मते मिळाली असून, शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिस्पर्धी कल्पना संदीप पाटील यांना 3 हजार 949 मते मिळाली.
 
तर शेतकरी कामगार पक्षाच्या अ‍ॅड.अंकिता मनिष माळी यांना अवघी 302 मते मिळाल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. नगरसेवकपदाच्या एकूण 20 जागांपैकी शिवसेना शिंदे गट व काँग्रेस युतीने 12 जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आघाडीला प्रत्येकी 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
 
murud
 
आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड शहरासाठी केलेल्या विकास कामांच्या बळावर शिंदे गटाची एकहाती सत्ता पुन्हा येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवख्या अनुराधा दांडेकर यांनी पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवत सर्वांनाच धक्का दिला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, प्रा. विश्वास चव्हाण, अविनाश दांडेकर तसेच माजी उपनगराध्यक्ष अ. रहीम कबले यांना पराभव पत्करावा लागला आहे.
 
murud
 
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करुन 5 पैकी 4 जागा जिंकत मोठे यश संपादन केले असून, थेट नगराध्यक्षपदासाठी अनुराधा दांडेकर यांच्या विजयात आघाडीचा मोठा वाटा असल्याची चर्चा राजकीय वतु र्ळात सुरू आहे. सभागृहात शिंदे गटाला बहुमत असले तरी थेट नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्र ेसच्या अनुराधा दांडेकर यांची निवड झाल्याने, शहराच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकमताने काम करावे, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0