अलिबागमध्ये शेकापचे वर्चस्व कायम , नगराध्यक्षपदी अक्षया नाईक यांचा दणदणीत विजय

22 Dec 2025 20:02:34
Alibag
 
अलिबाग । अलिबाग नगरपरिषदेवर पुन्हा एकदा लाल बावटा फडकला असून, शेकापने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. थेट नगराध्यक्षपदी अक्षया नमिता प्रशांत नाईक यांनी दणदणीत विजय मिळवत, महायुतीच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांचा पराभव केला.
 
शेकाप महाआघाडीने 19 पैकी 16 जागांवर विजय मिळवला आहे. भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाने नगरपालिकेत चंचू प्रवेश मिळवला आहे. अक्षया नाईक यांना 8 हजार 974 मते मिळाली. तर तनुजा पेरेकर यांना 2 हजार 334 मते मिळाली. शेकापचे संतोष मधुकर गुरव, संध्या शैलेश पालवणकर, सुषमा नित्यानंद पाटील, डॉ. साक्षी गौतम पाटील, आनंद अशोक पाटील, अ‍ॅड.निवेदिता राजेंद्र वाघमारे, अ‍ॅड.ॠषिकेश रमेश माळी, अ‍ॅड.अश्विनी ॠषिकेश ठोसर, अ‍ॅड.मानसी संतोष म्हात्रे, अ‍ॅड.निलम किशोर हजारे, अनिल रमेश चोपडा, योजना प्रदीप पाटील, सागर शिवनाथ भगत, शैला शेषनाथ भगत, वृषाली महेश भगत हे उमेदवार निवडून आले. तर काँग्रेसचे समिर मधुकर ठाकूर (हूनी) हेही निवडून आले आहेत.
 
Alibag
 
प्रशांत नाईक हे याआधीच बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे नगरपरिषदेतील 20 जागांपैकी 17 जागांवर शेकाप-काँग्रेस महाआघाडीने बाजी मारली आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि भाजपने नगरपरिषदेत चंचू प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे श्वेता संदीप पालकर आणि संदीप जनार्दन पालकर हे दाम्पत्य प्रभाग क्र. 4 मधून निवडून आले. विशेष म्हणजे पालकर दाम्पत्याने ही निवडणूक एकाकी लढवली आणि जिंकली.
 
Alibag
 
तर प्रभाग 7 मधून भाजपच्या अ‍ॅड.अंकित श्रीनिवास बंगेरा यांनी विजय मिळवला. त्यांच्या हा दुसरा प्रयत्न होता. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अभय म्हामुणकर (भाया) यांचा पराभव केला. बंगेरा यांच्या रुपाने अलिबागमध्ये भाजपने आपले खाते उघडले आहे. एकंदरीत, अलिबागकरांनी यावेळीदेखील शेकाप आणि प्रशांत नाईक यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
 

Alibag  
 
 
Powered By Sangraha 9.0