महाड । महाड नगरपालिकेवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीने नेते सुनील तटकरे या दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जात होती. महाड शहराने यापूर्वी कायम माणिक जगताप यांची साथ दिली होती.
त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या स्नेहल जगताप यांनी आधी शिवसेना ठाकरे गट व त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच निवडणूक होती. मात्र यावेळी महाडकरांनी मंत्री गोगावले यांच्यावर विश्वास दाखवत, नगरपालिकेची धुरा शिवसेनेच्या हातात दिली आहे.