श्रीवर्धन । राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या घरच्या मैदानात शिवसेनेची मशाल पेटली आहे. कुठलाही तामझाम आणि पक्षाचे पाठबळ नसताही ठाकरे गटाचे उमेदवार अॅड.अतुल चौगुले यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचा बलाढ्य उमेदवार माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांचा पराभव केला आहे.
हा पराभव राष्ट्रवादी किंबहुना खा. सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी हे महायुतीतील मित्रपक्ष एकत्र निवडणूक लढवत होते. तर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढत होते. अशा परिस्थितीत चौगुले यांच्या विजयामुळे भले भले भेंदरुन गेले आहेत.