उरण, कर्जतमधील पराभव भाजपच्या जिव्हारी

22 Dec 2025 17:35:34
 uran
 
उरण । उरण नगरपालिकेवर याआधी भाजपची म्हणजेच आमदार महेश बालदी यांची सत्ता होती. मात्र या निवडणुकीत उरणकरांनी बालदी यांना जोरदार झटका दिला आहे. भाजपकडून दिलेल्या उमेदवार शोभा कोळी-शाह यांचा महाआघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी पराभव केला आहे.
 
उरणकरांनी परिवर्तन घडवत महाविकास आघाडीच्या उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भावना घाणेकर यांना नगराध्यक्षपदी निवडून दिले आहे. भावना घाणेकर यांनी भाजपच्या शोभा कोळी-शाह, शिवसेना शिंदे गटाच्या रुपाली ठाकूर आणि अपक्ष उमेदवार नसरीन शेख यांचा पराभव केल. तर कर्जतमध्येही भाजपला पराभवाची चव चाखावी लागली. माजी आमदार सुरेश लाड यांच्या सुनबाई डॉ. स्वाती लाड यांचा महाआघाडीच्या उमेदवार पुष्पा दगडे यांनी पराभव केला.
 
 
Powered By Sangraha 9.0