अलिबाग । शेकापच्या अक्षया नाईक या सर्वांत कमी वयाच्या नगराध्यक्ष ठरल्या आहेत. अक्षया यांचे वय अवघे 22 आहे. त्या अलिबाग नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत.
अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष स्व.नमिता आणि प्रशांत नाईक यांच्या कन्या आहेत. अलिबागकरांनी पुन्हा एकदा प्रशांत नाईक यांच्यावर विश्वास दाखवला असून 20 पैकी 17 जागा त्यांनी जिंकल्या आहेत.