शेतकर्‍यांच्या खात्यात.. 2 हजार आले हो... , महाराष्ट्रातील 90 लाख शेतकर्‍यांना थेट लाभ

20 Nov 2025 20:20:14
 mumbai
 
मुंबई । पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हफ्त्याचे वितरण बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या हप्त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना लागवड, बियाणे, उपजीविका आणि इतर कृषी खर्चासाठी आवश्यक असे तातडीचे आर्थिक बळ मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
 
केंद्र सरकारच्या महत्वाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकर्‍यांसाठी 21 वा हप्ता आज वितरीत करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता देशातील लाखो शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. त्यामुळे लाखो शेतकर्‍यांना रब्बी हंगामात मदत होणार आहे.
 
- योजना शेतकर्‍यांना निश्चित वार्षिक उत्पन्न सहाय्य मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. योजनेनुसार पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. ही मदत रु. 2,000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट माध्यमातून शेतकर्‍यांच्या बँक खात्यांत जमा केली जाते.
 
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, योजनेचा 21 वा हप्ता महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या निधीमुळे रब्बी हंगामाच्या तयारीला मोठी मदत मिळेल. केंद्र सरकारकडून मिळणारे वेळेवरचे आर्थिक सहाय्य हे शेतकर्‍यांच्या स्थिर उत्पन्न व आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे, आणि योजनेच्या अंमलबजावणीत विभागामार्फत पूर्ण पारदर्शकता व समन्वय राखला जात आह
 
 
Powered By Sangraha 9.0