मुरुड जंजिरा । मुरूड जंजिरा नगरपरिषद निवडणूकी दाखल अर्जांपैकी 1 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदासाठी दाखल 12 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी 5 तर 74 नगरसेवक पदासाठी करिता अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार-आदेश डफल यांच्या कडे सुपुर्त करण्यात आले होते.
आज सकाळी 11 वाजता नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार-आदेश डफल यांनी प्रथम 5 नगराध्यक्षा च्या अर्जाची छाननी केली असता यामध्ये शिवसेना पक्षांकडून स्नेहा किशोर पाटील याचं उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले. नगराध्यक्षा पदाकरीता 4 उमेदवार तर नगरसेवकासाठी 62 उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले.