महाडमध्ये नगराध्यक्ष पदासह 27 अर्ज बाद

19 Nov 2025 19:11:13
 mahad
 
महाड । महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर छाननीच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी दाखल संकेत वारंगे आणि अनिकेत अनिल कविस्करहे दोन अर्ज बाद झाले. तर नगरसेवक पदासाठी दाखल अर्जापैकी 25 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.
 
महाड नगराध्यक्षपदासाठी 7 अर्ज तर नगरसेवक पदासाठी 74 अर्ज दाखल झाले होते. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत होणार आहे. तर नगरसेवकपदाच्या निवडणुकीत काही वार्डात तिरंगी व दुरंगी लढत होणार आहे. मात्र मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युती विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशीच होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0