रायगडात उमेदवारी अर्जांचा पाऊस , नगराध्यक्षपदांच्या दहा जागांसाठी 59 उमेदवारी अर्ज

18 Nov 2025 20:15:29
alibag\
 
अलिबाग । रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राजकीय तापमान चांगलेच चढले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला. जिल्ह्यातील 217 नगरसेवक पदांसाठी तब्बल 900 अर्ज दाखल झाले आहेत, तर 10 नगराध्यक्ष पदांसाठी 59 उमेदवारी दाखल करण्यात आली आहे.
 
ही निवडणूक अत्यंत चुरशीची, तिरंगी, चौरंगी व काही ठिकाणी पाच-सहा कोनांची होण्याची शक्यता दिसत आहे.
खोपोली आघाडीवर; पेण, उरण,कर्जतमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांपैकी खोपोली नगरपालिका उमेदवारांच्या संख्येत सर्वात पुढे आहे. खोपोलीत 31 जागांसाठी तब्बल 188 अर्ज दाखल झाले असून तीव्र स्पर्धा अपेक्षित आहे. पेणमध्ये 103, कर्जतमध्ये 92, तर उरणमध्ये 78 अर्ज दाखल झाले आहेत.रायगडमध्ये सत्तास्थापनेसाठी दोन प्रमुख आघाड्या आमनेसामने आल्या आहेत. दोन्ही आघाड्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत ताणतणाव, चर्चा व सौदेबाजी सुरू होती. काही नगरपरिषदांमध्ये आघाड्या जुळल्या; तर काही ठिकाणी स्वतंत्र लढाईचा निर्णय घेतला गेला.
नगरसेवकपदासाठी
अलिबाग : 20 जागांसाठी 75 अर्ज
श्रीवर्धन   : 20 जागांसाठी 68 अर्ज
मुरुड      : 20 जागांसाठी 74 अर्ज
रोहा        : 20 जागांसाठी 78 अर्ज
महाड     : 20 जागांसाठी 57 अर्ज
पेण         : 24 जागांसाठी 103 अर्ज
उरण       : 21 जागांसाठी 78 अर्ज
कर्जत      : 21 जागांसाठी 92 अर्ज
माथेरान   :20 जागांसाठी 87 अर्ज
एकूण अर्ज : 900
नगराध्यक्षपदासाठी
खोपोली 7
अलिबाग 6
श्रीवर्धन 5
मुरुड 5
रोहा 3
महाड 7
पेण 5
उरण 9
कर्जत 8
माथेरान 4
Powered By Sangraha 9.0