अलिबाग नगरपालिकेसाठी भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल ; नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या तनुजा पेरेकर

18 Nov 2025 20:33:56
mahad
 
महाड । जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून तनुजा पेरेकर यांनी अर्ज दाखल केला आहे.
 
यावेळी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, भाजपचे युवा नेते, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे नेत सतिश धारप, अ‍ॅड. आस्वाद पाटील, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. महेश मोहिते, महिला जिल्हा अध्यक्ष चित्रा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
याआधी भाजपकडून अ‍ॅड. अंकित बंगेरा यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अलिबागमध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका समजू शकलेली नाही. मात्र राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड. प्रविण ठाकूर यांची पत्नी कविता ठाकूर यांनी अलिबागच्या नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0