नवी मुंबई विमानतळावरुन , 25 डिसेंबरपासून प्रवासी सेवा ; अकासा एअर आणि इंडिगोची उड्डाणे जाहीर

17 Nov 2025 20:54:38
 navi
 
नवी मुंबई । नवी मुंबई आणि पनवेल परिसराच्या विकासातील ऐतिहासिक टप्पा म्हणून 25 डिसेंबर हा दिवस नोंदवला जाणार आहे. देशातील अत्याधुनिक आणि तंत्रज्ञानसमृद्ध नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दिवशी औपचारिकपणे प्रवासी सेवेसाठी सुरू होत आहे.
 
या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी झाले होते. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांत विमानतळ पूर्ण क्षमतेने उड्डाण सेवेसाठी सज्ज झाला आहे. पहिल्याच दिवशी प्रवाशांना आधुनिक टर्मिनल्स, सुटसुटीत प्रक्रियाद्वारे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्वोत्तम प्रवास अनुभवता येणार आहे.
 
26 डिसेंबरपासून अकासा एअर दिल्ली, गोवा, कोची आणि अहमदाबादसाठी नियमित उड्डाणे सुरू करणार आहे. अकासानंतर इंडिगोनेही आपल्या उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 25 डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रत्यक्ष उड्डाण घेणार असल्याने परिसरातील रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा आशावाद बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबईच्या विकासातील हा नवा सुवर्ण अध्याय आता प्रत्यक्षात येत असून शहराला जागतिक स्तरावरील जोडणी मिळणार आहे.
तकीट दर...
7,324 पासून पुढे असून प्रवाशांना 713 ब्ल्यूचिप्स (लॉयल्टी पॉईंट्स) दिले जाणार आहेत. हे उड्डाण सर्वात वेगवान असल्याचे इंडिगोचे म्हणणे आहे.
इंडिगोचे पहिले उड्डाण
इंडिगो फ्लाईट : 6 ई 5263
(नवी मुंबई-दिल्ली)
उड्डाण : 9.25 सकाळी
दिल्ली येथे आगमन : 11.15
उड्डाण कालावधी : 1 तास 50 मि.
अकासा एअरची पहिली अधिकृत उड्डाणे
दिल्ली-नवी मुंबई (क्युपी 1831)
उड्डाण : सकाळी 5.25
आगमन : सकाळी 8.10
नवी मुंबई-दिल्ली (क्युपी 1832)
उड्डाण : सकाळी 8.50
आगमन : सकाळी 11.15
Powered By Sangraha 9.0