तटकरेंच्या होमग्राऊंडवर शिवसेनेचा हल्लाबोल! राष्ट्रवादीने महाराष्ट्र लुटला । आ.महेंद्र दळवी यांचा घणाघात

11 Nov 2025 19:06:24
rohs
 
रोहा । तटकरेंचे होमग्राऊंड असलेल्या कोलाड नाक्यावर शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर अक्षरशः हल्लाबोल केला. 20 वर्षे उपभोगले तरी सर्व मलाच...मुंबई- गोवा महामार्ग त्यांच्यामुळेच रखडला, असा आरोप मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.
 
तर राष्ट्रवादीच्याच नेत्याने अजित पवारांचा घात केल्याचा गंभीर आरोप अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे.राष्ट्रवादीचे नेते खा. सुनील तटकरे यांचे खंदे समर्थ समजले जाणारे सुरेश महाबळे, मंगेश सरफळे यांनी रविवारी (9 नोव्हेंबर) शिवसेनेत प्रवेश केला. कोलाड नाक्यावर झालेल्या या कार्यक्रमात ना. गोगावले आणि आ. महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर टिकेची झोड उठवली. समजू नये. 20 वर्षे सर्वकाही उपभोगले रायगड ही आपली मक्तेदारी आहे, असे तरी आम्हालाच पाहिजे.
 
आणखी किती हवे तुम्हाला? इथेच करा आणि इथेच भोगा, मुंबई गोवा महामार्ग रखडला हे त्यांचेच पाप आम्ही चुकत नाही म्हणून झुकत नाहीत. आहे, असा आरोप ना.भरत गोगावले यांनी खा.तटकरेंवर केला. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही राष्ट्रवादीसह खा.तटकरेंवर हल्लाबोल केला. कोलाड नाक्याने 70 हजार कोटींचा घोटाळा पाहिला आहे, जमीन घोटाळा पाहिला आणि आता मुलासाठी बापाला खोटे बोलताना पाहत ही राष्ट्रवादीची संस्कृती असल्याची टिकाही आहेत.
 
राष्ट्रवादीने महाराष्ट्र लुटला, लूटमार दळवी यांनी केली. राष्ट्रवादीच्याच नेत्याने अजित पवारांचा घात केल्यांचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. राजकीय कारकिर्द सांगत, गाडीवर हल्ला सुरेश महाबळे यांनी सुनील तटकरेंची झाला तेव्हा हाच सुरेश महाबळे भिडला होता. आम्ही सामान्यांसाठी अनेक संघटना उभ्या केल्या त्या मोडण्याचे काम तटकरेंनी केले. सुरेशदादा एकटा टायगर आहे, असे म्हणत महाबळे यांनी तुफान फटकेबाजी केली.
 
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, अनिल नवगणे, संपर्कप्रमुख अरुण चाळके, तालुकाप्रमुख अ‍ॅड.मनोजकुमार शिंदे, युवासेना अध्यक्ष विपूल उभारे, चंद्रकांत लोखंडे, विजय बोरकर, ज्ञानदेव पवार, उस्मान रोहेकर, सचिन पाटेकर, महिला आघाडीच्या मिरगळ व जिल्हा, तालुक्यातील पदाधिकारी अमृता धनावडे, मयुरा मोरे, वैभवी भगत, सुरेश मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0