नवी मुंबई विमानतळामुळे रोजगार व पर्यटनाला नवी दिशा -अजित पवार

09 Oct 2025 20:46:16
 mumbai
 
नवी मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. "या विमानतळामुळे प्रवासासोबतच व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण आहेत,” असे त्यांनी सांगितले.
 
बुधवारी (८ ऑक्टोबर) लोकार्पण झालेली मेट्रो-३ मार्गिका मुंबईकरांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. ‘कुलाबा-बांद्रा-सीप्झ’ मार्ग सुरु झाल्याने शहराच्या दैनंदिन जीवनाला गती मिळणार असून, फेज २-बी’च्या उद्घाटनामुळे मुंबईला नवी गती मिळेल. ही भुयारी मेट्रो आधुनिक वाहतूक सुविधा असून, प्रगत शहरांच्या बरोबरीने मुंबईची ओळख वाढवेल, असेही पवार म्हणाले. सांगितले की, ‘मुंबई वन’ अ‍ॅप मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ, सुत्रबध्द आणि स्मार्ट बनवेल.
 
तसेच आज सुरु होणारे अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम युवकांसाठी आशेचे नवे दालन आहेत. कौशल्य विकासामुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले जात आहे. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांत देशाने विकासाची झेप घेतली आहे. ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयाकडे आपण वेगाने वाटचाल करत आहोत आणि महाराष्ट्र त्या प्रवासात अग्रस्थानी राहील.” मुंबईकरांचे जीवनमान सुधारेल व राज्याच्या प्रगतीच्या प्रवासाला गती मिळेल.
 
 
Powered By Sangraha 9.0