रायगडच्या भावेश म्हसकरची ‘आयआयएम’पर्यंत झेप ; म्हसळा येथील जि.प.शाळेत झाले प्राथमिक शिक्षण

07 Oct 2025 20:06:44
 mhasala
 
म्हसळा | तालुक्यातील खरसई गावातील भावेश जनार्दन म्हसकर यांनी शिक्षण क्षेत्रात एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास आता देशातील सर्वोच्च व्यवस्थापन संस्थांपैकी एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) उदयपूर येथे पोहोचला आहे.
 
भावेश यांनी आपले प्राथमिक शिक्षण रायगड जिल्हा परिषदेच्या खरसई शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम.कॉम. आणि एल.एल.बी. पदवी प्राप्त केली. शिक्षणाची आवड कायम ठेवत त्यांनी यापूर्वी इंदूर येथून व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केला होता. अलीकडेच भावेश यांची उदयपूरच्या विशेष व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून, या माध्यमातून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण आणि अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0