पनवेलमध्ये ९ महिन्यांत ३१ जुळी मुले जन्माला , आयव्हीएफमुळे जुळ्या मुलांचा वाढता जन्म दर

07 Oct 2025 20:34:30
panvel
 
पनवेल | नजीकच्या काळात जुळ्या मुले जन्माला येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात मागील नऊ महिन्यांत एकूण ३१ जुळ्या मुले जन्माला आली आहेत. अनेक कुटुंबांना मातृत्वाच्या समस्यांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अपत्य प्राप्ती होत असल्याने जुळ्या मुलांचे प्रमाण वाढले आहे.
 
सिझर व सामान्य प्रसूती
शासकीय रुग्णालयांमध्ये सामान्य प्रसूतीला प्राधान्य दिले जाते. मात्र, बाळाच्या आईची प्रकृती अचानक बिघडल्यास तपासणी करून सिझर करण्याचा निर्णय घेतला जातो. सध्या शासकीय रुग्णालयांमध्ये सामान्य प्रसूतीचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.
 
जुळे-तिळे जन्माची कारणे
आयव्हीएफ, आययूआय आणि इतर कृत्रिम गर्भधारणा तंत्रांमुळे जुळ्या-तिळ्या मुलांच्या जन्माचे प्रमाण वाढले आहे. स्त्रिया उशिरा गर्भधारणेचा निर्णय घेत असल्यामुळेही जुळ्या मुलांचा जन्म वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दोन्ही बाळांना एकाच वेळी दूध पाजण्याचा प्रयत्न (स्तनपान किंवा बाटलीने) केला पाहिजे.
 
यामुळे आईचा वेळ वाचतो आणि ती अधिक विश्रांती घेऊ शकते. बाळांची वाढ व्यवस्थित होत आहे की नाही, हे वजनावर नियमित लक्ष ठेवून तपासणे आवश्यक आहे. जुळ्या बाळांची काळजी घेताना आईचा थकवा आणि ताण जास्त होतो. त्यामुळे आईने पुरेशी विश्रांती घेणे अत्यंत आवश्यक आहे.
 
घरातील सदस्यांनी बाळांना सांभाळून आईला आराम देणे महत्त्वाचे आहे. पनवेल परिसरात मागील काही वर्षांत आयव्हीएफ सेंटरचे जाळे पसरले आहे. काही केंद्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचेही दिसून आले आहे.
Powered By Sangraha 9.0