महाड | एका दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिला जीवे ठार मारण्याची धमकी देणार्या ३७ वर्षीय नराधमाला एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. १ ऑक्टोबरच्या दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्यादरम्यान हा प्रकार घडला. पीडित आणि तिचे आईवडील मूळ भोर तालुक्यातील आहेत.
महाड येथे ते बिगारी काम करतात. वडील गावी आणि आई कामावर गेल्याने ही अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. ही संधी साधून सचिन सुतार (वय ३७ , रा. कुंभारकोंड - वरंध) याने पाणी पिण्याच्या बहाण्याने तिला घरी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
त्यानंतर कुणाला काही सांगितलेस तर जीवे ठार मारण्याची धमकीही त्याने पीडित मुलीला दिली. हा प्रकार मुलीच्या आईला समजल्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सचिन सुतार याच्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून सचिन सुतार याला अटक केली आहे.