एसटी कर्मचार्‍यांची दिवाळी गोड! 6 हजारांचा बोनस जाहीर

14 Oct 2025 17:36:27
 mumbai
 
मुंबई । एसटी कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार असून राज्य सरकारने त्यांच्यासाठी 6 हजार रुपयांच्या बोनसची घोषणा केली आहे. त्याचसोबत कर्मचार्‍यांना 12 हजारांची उचलही घेता येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हेदेखील उपस्थित होते. आपल्या मागण्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर संपाचं हत्यार उचलण्याचा निर्णय एसटी कर्मचारी संघटनांनी घेतला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनांसोबत बैठक घेतली आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
 
राज्य सरकारकडून एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांसाठी हात खुला करण्यात आला. राज्य सरकारकडून 48 हफ्त्यांमध्ये कर्मचार्‍यांची 2200 कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली. यंदा दिवाळीनिमित्ताने एसटी कर्मचार्‍यांना 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजे बोनस देण्यात येणार आहे. त्याचसोबत 12 हजार रुपयांच्या उचलसंदर्भात देखील घोषणा करण्यात आली. दरम्यान, मंगळवारपासून करण्यात येणारे आंदोलन एसटी कर्मचारी संघटनांनी मागे घेतला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0