पनवेल । पनवेल परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन व्यक्ती ठार आणि दोन जखमी झाल्याची घटना घडली आहे. पहिला अपघात कर्नाळा घाटातील मुंबई-गोवा महामार्गावर आणि दुसरा पनवेल- उरण मार्गावर झाला.
पहिल्या अपघातात होमगार्ड राजेंद्र जनार्दन पाटील (वय 50, रा. पेझारी, ता. अलिबाग) यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी दीपाली पाटील (वय 43) गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते पोयनाडहून पनवेलकडे खरेदीसाठी मोटारसायकलवर जात असताना कर्नाळा घाटातील उतारावर गाडी स्लीप होऊन दोघेही खाली पडले.
दुसर्या अपघातात पनवेल-उरण मार्गावरील करंजाडे येथे चिन्मय पाटील आणि त्याचा मित्र निर्भय भगत यांच्या स्कुटीला अज्ञात वाहन चालकाने धडक दिली. यात चिन्मय पाटील गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान पनवेल उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. तर निर्भय भगत गंभीर जखमी झाले.