नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत , भाजप कार्यकर्त्यांचे एकला चलो रे

13 Oct 2025 17:43:38
new mumbai
 
नवी मुंबई । नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी ‘एकाला चलो रे’ची भूमिका घेतल्याची माहिती पुढे आली आहे. नवी मुंबईत भाजपचाच महापौर व्हायला हवा, अशी ठाम भूमिका भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासमोर मांडल्याचे समजते.
 
नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक संघर्ष सुरु आहे. दोन्ही बाजूने वेगवेगळे राजकीय शाब्दीक वॉर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि चव्हाण यांनी नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर महायुती करायची की नाही? यासंबंधीचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या, सर्वांनी एकत्रीत घ्या आणि आम्हाला कळवा.
 
त्यावर योग्य तोच निर्णय घेतला जाईल, मात्र नवी मुंबईसारख्या शहरात भाजपचा महापौर व्हायला हवा अशाच पद्धतीची आखणी करायला हवी, अशा सूचना या दोन नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. दोन आठवड्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशाच प्रकारे शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला होता. या बैठकीत नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याचे आनंद दिघे यांचे स्वप्न होते.
 
new mumbai
 
ते पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे, असे वक्तव्य केले होते. मात्र युती होईल की नाही? याचा विचार तुम्ही करु नका. तुम्ही आपापल्या प्रभागांमध्ये काम करा, असे शिंदे यांनी म्हटले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम जवळ येऊ लागल्याने सर्वच राजकिय पक्ष कामाला लागले आहेत. भाजपच्या या दोन नेत्यांनी शनिवारी दिवसभर कोकण प्रातांतील पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांसोबत संवाद साधताना मिळाले.
 
यावेळी नवी मुंबईत भाजपचा महापौर होईल, अशीच परिस्थिती असल्याचे यावेळी स्थानिक नेत्यांनी सांगितल्याचे समजते. युतीसंबंधी स्थानिक पातळीवर आधी चर्चा करा. कोणत्या जागा आपल्याला मिळायला हव्यात. मित्रपक्षाचे माजी नगरसेवक असलेल्या जागांवर सध्याची परिस्थिती काय, या सर्वाचा एकत्रित अभ्यास करुन आमच्यापुढे मांडा, अशा सूचनाही या मंडळींना देण्यात आल्या.
 
 
Powered By Sangraha 9.0