माणगाव | माणगाव पोलीस ठाणे हद्दीत टेंडर मिळवून देण्याचे वचन देऊन १४ लाख ९० हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले, परंतु वर्कऑर्डर दिली नाही; याप्रकरणी ३ ते ४ भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ जानेवारी २०२५ ते २९ जानेवारी २०२५ दरम्यान या भामट्यांनी एन.ई.एफ. टी. व गुगल पे अॅपच्या माध्यमातून फिर्यादींना पोस्को महाराष्ट्र कंपनीच्या रस्ते आणि बिल्डिंग कामाचे टेंडर मिळवून देण्याचे वचन दिले. त्यांनी प्रथम १५ लाख रुपये भरल्यास वर्क ऑर्डर मिळेल असे सांगितले, परंतु १४ लाख ९० हजार रुपये मिळवून घेऊन वर्क ऑर्डर दिली नाही.
याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. ३१८(४), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.