बोर्ली-ताराबंदर गावात पाणीटंचाईची समस्या तीव , संतप्त महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा; सरपंच गैरहजर राहिल्याने संताप

12 Oct 2025 17:42:20
 murud
 
रेवदंडा | मुरुड तालुयातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील ताराबंदर गावात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या समस्येमुळे अखेर गावातील संप्तत महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. मात्र सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी गैरहजर राहिल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकत संताप व्यक्त केला.
 
गुरुवारी, १० ऑटोबर रोजी सकाळी अकरा वाजता ताराबंदर येथील महिलांनी हंडा मोर्चा काढला. परंतु त्यावेळी बोर्ली ग्रामपंचायत सरपंच सपना जायपाटील आणि ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित नव्हते. कर्मचार्‍यांनी संपर्क साधल्यावर सरपंच बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. मात्र दुपारी ठरलेल्या वेळेनंतरही सरपंच उपस्थित न राहिल्याने सायंकाळपर्यंत संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकून चावी आपल्या ताब्यात घेतली.
 
शुक्रवारी, दि. ११ ऑटोबर रोजी सकाळी सरपंच सपना जायपाटील आणि अधिकारी ग्रामपंचायतीत पोहोचले असता टाळे लावलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरविले यांची भेट घेऊन मध्यस्थी मागितली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर महिलांनी टाळे उघडण्यास सहमती दर्शविली. गेल्या काही महिन्यांपासून ताराबंदरमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना दीड-दोन किलोमीटर अंतरावरून नदी-नाल्यातून पाणी आणावे लागते. उन्हाच्या कडायात ही मेहनत महिलांवर शारीरिक आणि मानसिक ताण आणणारी ठरत आहे.
 
त्यामुळेच या गंभीर परिस्थितीविरोधात त्यांनी हंडा मोर्चाचे आयोजन केले होते. फणसाड धरणातील पाणी गावकर्‍यांऐवजी हॉटेल आणि लॉज व्यवसायिकांकडे वळविले जात असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.
 
 
Powered By Sangraha 9.0