अलिबाग | महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनार्यांनी ‘ब्लू फ्लॅग पायलट’ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन प्राप्त केले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील नागाव आणि श्रीवर्धन समुद्र किनार्याचा समावेश आहे. ‘ब्लू फ्लॅग’ मुळे या किनार्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा पर्यावरणीय आणि सुरक्षितता असल्याचे प्रमाण प्राप्त आहे.
या मानांकनामुळे मंत्री अदिती तटकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. ब्लू फ्लॅग राष्ट्रीय ज्युरी सदस्य व राष्ट्रीय ऑपरेटर यांनी महाराष्ट्रातील १० समुद्रकिनार्यांची पाहणी केली होती. या पहाणीनंतर केलेल्या मुल्यांकनातुन सन २०२५-२०२६ या हंगामासाठी पाच समुद्रकिनार्यांची ‘ब्लू फ्लॅग पायलट दर्जा’ प्रदान केला आहे.
यामध्ये डहाणूमधील पारनाका बीच, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व नागाव बीच तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लाडघर बीच यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पर्यटनवाढीसाठी मिळालेले हे मानांकन मैलाचा दगड ठरणारे आहे. ब्लू फ्लॅग पायलट हा दर्जा मिळालेल्या किनार्याला उत्तम गुणवत्ता प्रमाणपत्र म्हणून मान्यता दिली जाते. ज्या किनार्यावर हा ध्वज फडकतो, तो किनारा जागतिक स्तरावर सुरक्षित आणि उत्कृष्ट मानला जातो.
शासनाच्या शाश्वत आणि जबाबदार पर्यटन धोरणांमुळे भविष्यात या किनार्यांवर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील, ज्यामुळे पर्यटन वृद्धिंगत होईल आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल असा विश्वार ना. अदिती तटकरे यांना व्यक्तकेले आहे.
‘ब्लू फ्लॅग पायलट’ म्हणजे काय?
‘ब्लू फ्लॅग’ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पर्यावरणीय आणि सुरक्षितता मानकांचा प्रतीक आहे. जे समुद्रकिनारे, मरीने किंवा पाणथळ भाग या मानकांना पूर्ण करतात, त्यांना ‘ब्लू फ्लॅग पायलट’ किंवा ‘ब्लू फ्लॅग’ दर्जा दिला जातो.