मध्यरात्री कॅब प्रवासात महिलेचा विनयभंग? चालकाविरोधात तक्रार

महिलेची चालकाविरोधात नवी मुंबई विमानतळ पोलिसांत तक्रार

By Raigad Times    08-Sep-2026
Total Views |
panvel
 
पनवेल | मुंबईतून कॅबने पनवेलला परतणार्‍या महिलेबरोबर कॅबचालकाने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाने कॅब थांबवून चालकाने महिलेचा हात पकडून तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महिलेने प्रसंगावधान राखत कॅबमधून बाहेर पडून आपली सुटका करून घेतली.
 
या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अफझल शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला रविवारी (६ सप्टेंबर) रात्री चेंबून येथून पार्टी आटोपल्यानंतर तिच्या मैत्रिणीने बुक केलेल्या कॅबने पनवेल येथील घरी जात होती.
 
मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमाराच विमानतळ सेवा रस्त्यावर कॅबचालकाने पाणी पिण्याच्या बहाण्याने वाहन थांबविले. आणि मागील आसनावर बसलेल्या महिलेच्या शेजारी जाऊन बसला. महिलेचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केले तसेच तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला.
 
या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने चालकाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर कॅब चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर महिलेने कुटुंबीयांशी संपर्क साधला. याबाबत पनवेल पोलिसांकडे गेली. महिलेच्या तक्रारीवरून नवी मुंबई विमानतळ पोलिसांनी मोहम्मद अफझल शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.