खालापूरातील स्वामी समर्थ मठात चोरी ; लाकडी पादुका व चांदीचे आवरण लंपास

By Raigad Times    04-Sep-2026
Total Views |
 karjat
 
खालापूर | खालापूर येथील स्वामी समर्थ मठात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून लाकडी पादुका आणि चांदीचे आवरण असा एकूण १ लाख ६० हजार ५२२ रुपये किमतीचा ऐवज चोरी करून पोबारा केल्याची २ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.३२ वाजण्याच्या सुमारास खालापूर येथील स्वामी समर्थ मठामध्ये ही चोरी झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात दोन चोरट्यांनी मठाचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत आत प्रवेश केला.
 
त्यानंतर मठातील लाकडी पादुका तसेच चांदीचे आवरण असा एकूण १ लाख ६० हजार ५२२ रुपये किमतीचा ऐवज फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.