चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपी आठ तासांत अटकेत

By Raigad Times    24-Sep-2026
Total Views |
panvel
 
पनवेल | आठ वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या आठ तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली.
 
याप्रकरणी २२ सप्टेंबर रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २१ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे नोंदविण्यात आले आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला.
 
तांत्रिक तपासासह विविध पातळ्यांवर तपास करून आठ तासांत आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. बालकासंबंधीचे प्रकरण संवेदनशील असल्याने पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.