रायगड जिल्ह्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणार्या उरण शहरातील चारफाटा सर्कलवर लागलेल्या बॅनर्सच्या विळख्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील चौकाचौकांमध्ये वाढलेली ही अनधिकृत होर्डिंग्ज केवळ प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करत नसून, स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत.
सिग्नलच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रणाचा प्रयत्न सुरू असताना, सर्कलवरील या अनाधिकृत बॅनर्समुळे वाहनचालकांची दृश्यता कमालीची कमी होत असून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही केवळ उरणपुरती मर्यादित नसून संपूर्ण रायगड जिल्ह्याची गंभीर समस्या बनली आहे. चौक, सर्कल आणि रस्त्यांच्या कडेला पसरलेल्या या बेसुमार जाहिरात फलकांमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित आणि अपघातांची शक्यता कैक पटींनी वाढते.
या जीवघेण्या समस्येकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून, कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी यंत्रणेने कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे याविरुद्ध तात्काळ ठोस पावले उचलणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी आणि निकडीची गरज बनली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आज सार्वजनिक जागा, महत्त्वाचे चौक, वर्दळीचे आणि चौकाचौकात उभ्या राहिलेल्या जाहिरात फलकांचा आणि बॅनर्सचा विळखा हा एक अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय बनला आहे.
केवळ शहरांमध्येच नव्हे, तर ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवरही या फलकांची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक रित्या वाढताना दिसत आहे. रायगडच्या शिरपेचात अनेक ऐतिहासिक आणि भौगोलिक वैभवाचे तुरा रोवले गेलेले असले, तरी आज याच अनाधिकृत आणि अवाजवी बॅनर्सच्या संकटाने वेढले आहे. यात विशेषतः उरण शहराचा विचार केला तर, उरण शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणार्या चारफाटा सर्कलवर वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि ती नियंत्रित करण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे.
परंतु, याच चारफाटा परिसरातील सर्कलवर मोठ्या प्रमाणावर लागलेल्या बॅनर्सच्या विळख्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा आणि सुरळीत गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहराच्या सौंदर्यास बाधा पोहोचवणारे हे फलक आता प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या जिवावर बेतू लागले आहेत, ज्यामुळे स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सिग्नलच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रणाचा प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे सर्कलवरील या बॅनर्समुळे वाहनचालकांची दृश्यता कमालीची कमी होत असून, प्रशासनाच्या एकूणच वाहतूक नियोजनावर यातून मोठे निर्माण झाले आहे.
उरणच्या या प्रातिनिधिक उदाहरणावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यातील विदारक स्थिती स्पष्ट होते, जिथे विकासाच्या किंवा अभिनंदनाच्या नावाखाली लावल्या जाणार्या फलकांनी नागरिकांच्या जीवाचा घात चालवला आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल, अलिबाग, महाड, रोहा, खालापूर, कर्जत यांसारख्या प्रमुख तालुक्यांमधील वर्दळीची ठिकाणे असोत किंवा ग्रामीण व शहरी सीमांना जोडणारे रस्ते असोत, बेसुमार बॅनर्सचे जाळे पसरलेले दिसते.
राजकीय नेत्यांचे वाढदिवस, विविध सोहळे किंवा उत्सवांच्या नावाखाली रस्त्यांच्या कडेला आणि चौकात हे बॅनर्स झळकावले जातात. नियमांना आणि परवानगीला बगल देऊन उभारले जाणारे हे फलक सौंदर्याची लक्तरे तर वेशीवर टांगतातच, परंतु त्याहून अधिक ते निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळतात. वाहन चालवत असताना चालकाचे लक्ष करण्याचे काम हे फलक करतात.
अनेकदा रात्रीच्या वेळी वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश या फलकांवर पडल्यामुळे परावर्तित होणार्या रंगसंगतीमुळे चालकांचे डोळे दिपतात आणि क्षणार्धात मोठा अपघात ओढवण्याची दाट शक्यता निर्माण होते. दुचाकीस्वारांना अचानक समोरून येणारी वाहने दिसत नाहीत, तर चारचाकी वाहनांना वळण घेताना किंवा रस्ता ओलांडताना समोरून येणार्या वाहनांचा अंदाज घेणे होऊन बसते.
उरणच्या चारफाटा सर्कलसारख्या ठिकाणी तर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते, आणि अशातच लावलेले बॅनर्स सिग्नल, वळण आणि समोरील वाहतूक पाहण्यात मोठा अडथळा ठरतात. या समस्येची भीषणता केवळ वाहतुकीच्या कोंडीपुरती किंवा दृश्यतेच्या समस्येपुरती मर्यादित नाही, तर यामुळे थेट अपघातांची शक्यता कैक पटींनी वाढली असून अनेक ठिकाणी दुर्दैवी अपघात देखील आहेत.
वाहतूक सुरक्षा हा केवळ प्रशासनाचाच नव्हे तर प्रत्येक नागरिकाचा विषय असला, तरी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांचीच असते. प्रशासकीय यंत्रणांनी आणि संबंधित प्राधिकरणांनी बॅनर्स लावण्यासंदर्भात काही नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली असतात, परंतु प्रत्यक्षात या नियमांची पायमल्ली होताना दिसते.
जाहिरातबाजीतून मिळणार्या उत्पन्नाचा राजकीय दबावापोटी प्रशासनाकडून या प्रकारांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते का, असा संतप्त सवाल आता रायगडमधील सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेचा बळी देऊन चाललेली ही अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर्सची संस्कृती जिल्ह्याच्या प्रगतीला काळिमा फागणारी आहे. या अनधिकृत प्रकारांना आळा घालण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची तीव्र आवश्यकता असून, कोणत्याही दबावाला बळी पडता प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आता काळाची गरज बनली आहे.
एखादा भीषण अपघात घडल्यानंतर किंवा प्राणहानी झाल्यानंतर प्रशासनाला जाग येते आणि मग तात्पुरती कारवाई केली जाती. परंतु, त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. ही प्रतिक्रियावादी भूमिका आता बदलण्याची वेळ आली आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोठ्या दुर्घटनेची वाट न बघता तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख चौक, रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणांची पाहणी करून वाहतुकीस अडथळा ठरणारे सर्व प्रकारचे अनधिकृत फलक आणि बॅनर्स विनाविलंब हटवले पाहिजेत.
केवळ उरणच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात असे नियमभंग करणारे फलक लावणारे राजकीय कार्यकर्ते, संघटना किंवा संस्था कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला गेला पाहिजे. सार्वजनिक सुरक्षेचा बळी देऊन स्वतःच्या प्रसिद्धीचा झेंडा रोवणार्या अशा प्रवृत्तींना जर वेळीच वेसण घातली नाही, तर भविष्यात आणखी बळी जाण्याची भीती नाकारता येत नाही.
विशेषतः शाळकरी मुले आणि वृद्धांच्या सुरक्षिततेचा विचार करून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर पूर्णपणे बंदी घालणे प्रशासनाचे आद्य कर्तव्य त्यामुळे नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न बनलेल्या या गंभीर विषयावर शासनाने तातडीने विशेष पथक स्थापन करून कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणे अत्यंत गरजेचे ठरले आहे. नागरिकांचे प्राण वाचवणे हे कोणत्याही प्रशासनाचे सर्वोच्च कर्तव्य असते, आणि चौकाचौकांत बॅनर्सचे जाळे पसरवून तो जीव धोक्यात घालण्याचे स्वातंत्र्य कोणालाही दिले जाऊ शकत नाही. वेळीच कठोर उचलली नाहीत, तर हा बॅनर्सचा विळखा संपूर्ण जिल्ह्याला उद्ध्वस्त करायला वेळ लागणार नाही.