अलिबाग-रोहा एसटीत चोरी ; प्रवासी महिलेचे साडेसात लाखांचे दागिने लंपास

By Raigad Times    01-Sep-2026
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग | अलिबाग-रोहा एसटी बसमधून प्रवास करणार्‍या एका महिला प्रवाशाच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने तब्बल ७ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी दुपारी बेलकडे गावाजवळ घडली. संस्कृती पाटील या अलिबाग येथून वलवली-बेलोशी येथे जाण्यासाठी अलिबाग-रोहा एसटी बसमधून प्रवास करीत होत्या.
 
दुपारी सुमारे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास एसटी बस बेलकडे गावाजवळ आली असता, बसमधील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील छोट्या पाकीटामधून सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार, असा एकूण ७ लाख २० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
 
काही वेळानंतर प्रवासादरम्यान दागिने चोरीला गेल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरीचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हंबीर करीत आहेत. दरम्यान, पोलिसांकडून तांत्रिक माहितीच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे. एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेत एवढ्या मोठ्या किमतीचे दागिने चोरीला गेल्याने प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.