उरण | रेवस-करंजा पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून, या कामासाठी धावणार्या अवजड वाहनांमुळे रेवस-करंजा मार्गावरील वाहतूक आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुलाच्या कामासाठी क्रेन, बल्कर, डंपर, बोल्डर वाहने, रोलर्स, कंटेनर आणि पाण्याच्या टँकरची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
रेवस-करंजा फेरी सेवा, करंजा फिशिंग जेट्टी आणि पुलाचे काम यामुळे या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी, वाहनचालक आणि नागरिकांची ये-जा असते. त्यातच द्रोणागिरी हायस्कूल परिसरातून शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चाणजे ग्रामपंचायत तसेच विविध स्थानिक संघटनांकडून कंपनी प्रशासनाला याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
द्रोणागिरी हायस्कूलकडूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कंपनीला पत्र देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. द्रोणागिरी हायस्कूल, करंजा परिसरातून शाळकरी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा होते. अशा परिस्थितीत अवजड वाहने वेगाने ये-जा करीत असल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शयता आहे. या समस्येबाबत चाणजे ग्रामपंचायत आणि विविध स्थानिक संघटनांकडून कंपनी प्रशासनाला वेळोवेळी सूचना करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
द्रोणागिरी हायस्कूलकडूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात कंपनी प्रशासनाला पत्र देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या सूचनांची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप होत आहे. विकासकामाला विरोध नसून पुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे, हीच नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, अवजड वाहनांसाठी योग्य वाहतूक नियोजन, वेगावर नियंत्रण आणि शाळेजवळ सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ‘अपघात होण्याची वाट पाहू नका,’ असा संतप्त इशाराही नागरिकांनी दिला आहे.