अलिबाग | थळ बाजारात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन, तरुणाला अटक

By Raigad Times    01-Sep-2026
Total Views |
 ALIBAG
 
अलिबाग | थळ बाजार येथील एकविरा देवी मंदिर परिसरात एका अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास थळ बाजार, ता. अलिबाग येथील एकविरा देवी मंदिरासमोरील परिसरात ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडित मुलगी घरी जात असताना आरोपीने तिचा डावा हात पकडून तिला जवळ ओढले आणि तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
 
तसेच आरोपीने स्वतःचा मोबाईल क्रमांक एका कागदावर लिहून तो कागद मुलीच्या हातात जबरदस्तीने देत त्याला फोन करण्यास सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी ३० ऑगस्ट रोजी पहाटे ५.३२ वाजण्याच्या सुमारास आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दडस करीत आहेत.