नवी मुंबई । नागरी सुविधांच्या पूर्तीसोबतच नागरिकांच्या सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विविध विभागांच्या आढावा बैठकीत दिले.
विशेषतः अतिधोकादायक सी-1 श्रेणीतील इमारती, विनावापरातील पडीक बांधकामे, कोचिंग क्लासेसची सुरक्षा, अनधिकृत फेरीवाले आणि होर्डिंग्ज याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.आयुक्तांनी सी-1 श्रेणीतील इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करून त्या तातडीने रिकाम्या कराव्यात, तसेच दुर्घटना टाळण्यासाठी अशा इमारतींचा वीज, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्था त्वरित खंडित करण्याचे निर्देश दिले.
शहरातील पडीक व धोकादायक बांधकामांचे विभागनिहाय सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार निष्कासनाची कार्यवाहीही तातडीने प्रस्तावित करण्यास सांगितले. इतर शहरांतील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व कोचिंग क्लासेस व शिकवणी वर्गांचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आणि अग्निशमन ऑडिट करण्यात यावे, तसेच संबंधित संस्थांनी आवश्यक परवाने व ना हरकत प्रमाणपत्रे महापालिकेकडे सादर करावीत, असेही निर्देश देण्यात आले.
अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रूपीकरण आणि महसुलाचे नुकसान होत असल्याने लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार स्वतंत्र धोरण तयार करून त्याची काटेकोर फेरीवाल्यांमुळे वाहतूक आणि स्वच्छतेवर परिणाम होत अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. तसेच वाढत्या असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईची तीव्रता वाढवून अधिकृत फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन प्रभावीपणे कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले.
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी दक्ष अॅपचा प्रभावी वापर, कचरागाड्यांवर कॅमेरे बसविणे, मोठ्या गृहसंकुलांमध्ये ओलासुका कचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, 15 ऑगस्टपूर्वी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वितरण आणि पावसाळी आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, डॉ. राहुल गेठे, उपआयुक्त किसनराव पलांडे, शहर अभियंता शिरीष यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण महसूलवाढीसाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविणे आणि महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील ठरावांची विनाविलंब अंमलबजावणी करण्याचे निर्देशही आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले.