मनसेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

By Raigad Times    04-Aug-2026
Total Views |
mahad
 
महाड । महाड शहरातील सामाजिक कार्यासाठी ओळख असलेल्या बाल मित्र मंडळ आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या एसटी स्मार्टकार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 
शनिवारी शाळा क्रमांक 1 च्या आवारात झालेल्या या शिबिरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 151 नागरिकांनी स्मार्टकार्डसाठी नोंदणी करून लाभ घेतला. शिबिराची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर महाड बाजारपेठेतील ज्येष्ठ नागरिक डॉ. सूर्यकांत शेठ यांच्या स्मार्टकार्ड नोंदणीने शिबिराचा शुभारंभ झाला.
 
शिबिरात सुमेध जाधव यांनी नागरिकांना स्मार्टकार्ड काढण्याची संपूर्ण प्रक्रिया सविस्तर समजावून सांगत आधारकार्डच्या माध्यमातून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याने शिबिराला उत्साहाचे वातावरण लाभले.
 
यावेळी बाल मित्रमंडळाचे अध्यक्ष सुयोग पोरे, महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा नगरसेविका अक्षया हेलेकर, यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मंडळाच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्याच परंपरेत आयोजित करण्यात आलेल्या एसटी स्मार्टकार्ड शिबिरालाही नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देत मंडळाच्या सामाजिक बांधिलकीला पुन्हा दाद दिली.