‘सरोगसी’ हा शब्द आ.महेंद्र दळवींनी लिहून दाखवावा;आ.अनिकेत तटकरेंचा पुन्हा पलटवार

By Raigad Times    31-Aug-2026
Total Views |
 ALIBAG
 
अलिबाग | "महेंद्र दळवींना ‘सरोगसी’ हा शब्द मराठीत किंवा इंग्रजीत लिहिता येत असेल तर तो लिहून दाखवावा. दोन टर्म आमदार असलेल्या व्यक्तीला ‘सरोगसी’ या शब्दाचा अर्थ माहीत आहे का, हे तरी आम्हाला कळेल,” अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांनी पुन्हा एकदा पलटवार केला आहे.
 
आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर टीका करताना त्यांचा ‘सरोगसी बाळ’ असा उल्लेख केला होता. तसेच अर्ज मागे घेतला नसता तर त्यांचा राजकिय जन्म झाला नसता अशी टिका केली होती. या टिकेला आ.अनिकेत तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "आ. महेंद्र दळवींना ‘सरोगसी’ हा शब्द मराठीत किंवा इंग्रजीत लिहून दाखवावा असा खोचक टोला लगावला आहे.
 
त्यांच्या या वक्तव्यानंतर तटकरे आणि दळवी यांच्यातील वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत अनेक वर्षे वाद राहिला आहे. विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादीला आणि पालकमंत्रीपद शिवसेनेला असे वाटून घेतल्यानंतर हा वाद शांत होईल असे वाटत होते. मात्र दळवी आणि तटकरे यांच्यात वाक्युध्द सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे रायगडमधील महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.