दुचाकीला गायीची धडक;बारणे येथील तरुणाचा मृत्यू

By Raigad Times    30-Aug-2026
Total Views |
 karjat
 
कर्जत | तालुक्यातील बारणे गावातील २३ वर्षीय तरुणाचा दुचाकीला गाय धडकल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना २६ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास तिवरे मराठी शाळेजवळ घडली. या घटनेने बारणे गावावर शोककळा पसरली आहे. बारणे गावातील २३ वर्षीय तरुण हा मित्रासोबत दुचाकीवरून तिवरेकडून कर्जतच्या दिशेने येत होता.
 
२६ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास तिवरे मराठी शाळेजवळ तो स्वतःची स्प्लेन्डर मोटारसायकल चालवत असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष झाले. त्याचवेळी रस्त्यावर असलेल्या गायीला दुचाकीची धडक बसली.
 
या अपघातात तरुणाच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. त्याला झालेल्या लहान- मोठ्या दुखापती गंभीर स्वरूपाच्या असल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.