श्रीवर्धन शहर बाजारपेठेत प्लास्टिक बंदी कागदावरच!

By Raigad Times    30-Aug-2026
Total Views |
shreewardhan
 
श्रीवर्धन | शहरातील बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. काही व्यापारी पर्यावरणाची काळजी घेत ग्राहकांना कापडी किंवा कागदी पिशव्या देत असले, तरी काही दुकानदारांकडून ग्राहकांना खुलेआम प्लास्टिकच्या कॅरीबॅग दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
 
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टिकच्या वापरावर विविध निर्बंध लागू केले आहेत. विशेषतः पावसाळ्यात त्या नाले, गटारे आणि सांडपाण्याच्या परिणामी परिसरात पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच प्लास्टिक कचरा जाळल्यास विषारी वायू निर्माण होऊन पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची शयता असते.
 
मात्र, आता पुन्हा काही व्यापार्‍यांकडून कॅरीबॅगचा वापर सुरू झाल्याने प्रशासनाच्या नियमित तपासणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. व्यापार्‍यांवर कारवाई न करता ग्राहकांमध्येही जनजागृती होणे गरजेचे आहे. बाजारात जाताना नागरिकांनी कापडी पिशवी सोबत ठेवावी, व प्रशासनाने बाजारपेठेत नियमित तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यापार्‍यांवर कठोर कारवाई करावी. तसेच प्लास्टिकमुक्त श्रीवर्धनच्या दिशेने ठोस पाऊल पडेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.