वाडगावची सुवर्ण कामगिरी

By Raigad Times    03-Aug-2026
Total Views |
wadgoa
 
कोणत्याही राज्याचा किंवा देशाचा खरा विकास हा तिथल्या महिलांच्या प्रगतीवर आणि सक्षमीकरणावर अवलंबून असतो. महिलांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक क्षेत्रात सक्षम बनवण्यासाठी शासन स्तरावर अनेक योजना आणि अभियान राबवले जातात.
 
आधुनिक लोकशाही व्यवस्थेमध्ये ग्रामीण भागाचा विकास हा देशाच्या प्रगतीचा कणा मानला जातो, आणि या विकासाची दिशा ठरवताना महिलांचा सहभाग अत्यंत निर्णायक ठरतो. महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात आलेल्या आदिशक्ती अभियान २०२५- २०२६ च्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाच्या कामांना मोठी गती मिळाली आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाने केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात गावोगावी परिवर्तनाची नवी नांदी रोवली आहे, ज्यामुळे महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत असल्याचे दिसून येत आहे.
 
या अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून आदिशक्ती पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, यामध्ये अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीने राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून संपूर्ण रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. हा ऐतिहासिक विजय केवळ एका ग्रामपंचायतीचा नसून, संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद, गौरवास्पद आणि प्रेरणादायी असाच एक टप्पा ठरला आहे.
 
महिला व बाल विकास विभागाने ३१ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरीय आदिशक्ती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये महिला विकासाच्या कामांची स्पर्धा निर्माण झाली असून, पारदर्शक मूल्यांकनानंतर ही नावे जाहीर करण्यात आली आहेत. या राज्यस्तरीय पुरस्कारांच्या स्पर्धात्मक वातावरणात कोकण विभागातील अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकाचे मानांकन पटकावले आहे.
 
कोकण विभागाच्या शिरपेचात या विजयामुळे मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. याचबरोबर, सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी (ता. वाळवा) आणि कवठेपिराण (ता. मिरज) या ग्रामपंचायतींना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. सांगली जिल्ह्यासारख्या पुरोगामी जिल्ह्यातील या ग्रामपंचायतींच्या कामगिरीची दखल घेतली जाणे हे देखील ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीचे एक मोठे लक्षण मानले जात आहे.
 
राज्यभरातून आलेल्या विविध प्रस्ताव आणि कामांच्या मूल्यमापनानंतर वाडगाव ग्रामपंचायतीने मारलेली ही बाजी ग्रामपातळीवरील उत्कृष्ट नियोजनाची आणि प्रभावी अंमलबजावणीची साक्ष देते. तज्ज्ञांच्या मते, कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर केलेल्या कामांचे चीज कसे होते, याचे उत्तम उदाहरण या निकालातून समोर आले आहे. महिला व बाल विकास विभागाकडून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजेच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक सक्षमीकरणासाठी राज्यभर आदिशक्ती अभियान राबवले जात आहे.
 
महिलांना कुटुंबाच्या आणि समाजाच्या केंद्रस्थानी आणून त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव देणे हा या अभियानाचा मुख्य गाभा आहे. ग्रामीण भागातील महिलांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे, आरोग बाबत जागरूक करणे आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेची काळजी घेणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. आजच्या गुंतागुंतीच्या काळात महिलांची सुरक्षा आणि त्यांचे आरोग्य हे सर्वात मोठे प्रश्न बनले असताना, ग्रामपंचायत स्तरावर असे उपक्रम राबवणे अत्यंत गरजेचे ठरले आहे.
 
या अभियानाची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करणार्‍या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कामाची दखल घेण्यासाठी राज्य शासनाने आदिशक्ती पुरस्कार योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे केवळ बक्षीस मिळत नाही, तर स्थानिक प्रशासनाला अधिक जोमाने आणि पारदर्शकतेने काम करण्याची मोठी ऊर्जा मिळते. या योजनेमुळे ग्रामीण स्तरावर स्पर्धा निर्माण होऊन लोककल्याणकारी उपक्रम राबवण्याची चुरस वाढीस लागली आहे. गावोगावच्या स्थानिक स्वराज्य संस्था आता विकासाच्या स्पर्धात्मक युगात आदिशक्ती अभियानामुळे अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
 
वाडगाव ग्रामपंचायतीने राजयात अव्वल स्थान मिळविल्याने रायगड जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची व गौरवाची बाब मानली जात आहे. रायगड जिल्ह्याचा हा बहुमान संपूर्ण कोकण विभागासाठीही एक अभिमानास्पद क्षण ठरला आहे, ज्याची चर्चा संपूर्ण राज्यभरात होत आहे. ग्रामपंचायतीने राबवलेले महिला सक्षमीकरण आणि लोकाभिमुख उपक्रम आता राज्यस्तरावर पोहोचले असून, या कामाची दखल घेतली गेल्याची भावना संपूर्ण जिल्ह्यात व्यक्त होत आहे. सामान्य लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर शाश्वत उपाय शोधण्याचे काम वाडगाव ग्रामपंचायतीने करून दाखवले आहे.
 
ग्रामपातळीवर जेव्हा लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थ एकत्र येऊन काम करतात, तेव्हा किती मोठे यश मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण वाडगावने घालून दिले आहे. सहभागात्मक लोकशाहीचे हे सर्वात सुंदर रूप असून, ग्रामस्थांची एकजुट हीच या यशाची खरी पायाभरणी ठरली आहे. या यशामध्ये सरपंच, सर्व सदस्य तसेच माजी सरपंच जयेंद्र भगत यांचा अत्यंत मोलाचा आणि मोठा वाटा आहे. जुनी जाणती नेतृत्व आणि नवीन विचारांची सांगड घालून त्यांनी ज्या प्रकारे विकासाची मोट बांधली, ती खरोखरच कौतुकास्पद आहे.
 
नेतृत्वाची अचूक दिशा आणि सामूहिक प्रयत्नांची जोड मिळाली की विकासाचे कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नसते, हेच या मधून सिद्ध झाले आहे. एकजुटीच्या बळावर डोंगरएवढी कामे कशी पार पाडता येतात, याचा वस्तुपाठ वडागावने इतर गावांसाठी घालून दिला आहे. आजच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका केवळ दप्तरी कामे सांभाळण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे केंद्र म्हणून ग्रामपंचायती काम करत आहेत.
 
गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर पारदर्शक कारभार आणि लोकसहभाग या दोन गोष्टींशिवाय पर्याय नाही, हे या ग्रामपंचायतीने सिद्ध केले आहे. वडागाव ग्रामपंचायतीने महिलांच्या विकासाला प्राधान्य देऊन जे उपक्रम राबवले, त्यांनी खर्‍या अर्थाने महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. महिलांच्या हाताला काम, मुलांना दर्जेदार शिक्षण आणि कुटुंबाला आरोग्यविषयक आधार देण्याचे काम या उपक्रमांतून झाले आहे.
 
शैक्षणिक जाणिवा रुंद करणे, आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे, आरोग्याच्या पुरेशा सुविधा आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर गावाने दिलेला भर कौतुकास्पद आहे. भविष्यात ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी अशाच प्रकारच्या शाश्वत योजनांची गरज संपूर्ण देशात भासणार आहे. या पुरस्कारामुळे इतर ग्रामपंचायतींनाही प्रेरणा मिळेल आणि भविष्यात अशाच प्रकारच्या लोककल्याणकारी उपक्रमांची राज्यभरात पुनरावृत्ती होईल, यात शंका नाही.