दहीहंडी उत्सवात गोविंदांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्टची उपलब्धता अनिवार्य - अदिती तटकरे

By Raigad Times    28-Aug-2026
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग | दहीहंडी उत्सवासाठी परवानगी देताना सुरक्षेच्या सर्व उपाययोजना पूर्ण झाल्याची खात्री करावी. विशेषतः गोविंदांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्टची उपलब्धता अनिवार्य ठेवावी आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना पूर्ण केल्याशिवाय परवानगी देऊ नये, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिल्या.
 
वाहतूक कोंडीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार सुविधा केंद्रांची संख्या वाढवावी. ज्या ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंट किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी तात्पुरती सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारावीत. वाहतूक कोंडीत अडकणार्‍या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 
जिल्ह्यातील स्थानिक खासगी रेस्क्यू टीमशी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने समन्वय साधावा त्यामुळे सणासुदीच्या काळात त्यांची मदत तातडीने उपलब्ध होईल, अशा सूचना अदिती तटकरे यांनी दिल्या.