म्हसळा | म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात दुसर्या आरोपीनेही मुलीशी गैरवर्तन करून पहिल्या आरोपीला प्रोत्साहन दिल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. २७ फेब्रुवारी २०२६ ते २३ ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. एकाने पीडित मुलीशी ओळख वाढवून मैत्री केली.
त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तर दुसर्या आरोपी यानेही पीडित मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून पुढील तपास म्हसळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव करीत आहेत.