अलिबाग । रायगड जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 73 उद्योगांसोबत तब्बल 5 हजार 480.93 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीतून जिल्ह्यात 4 हजार 413 नवीन रोजगारांच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती उपायुक्त संदिप पाटील यांनी दिली. रायगडचे नवनियुक्त पालकमंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते या परिषदेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी रायगडला गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.रायगड जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 बुधवारी (19 ऑगस्ट) रोजी अलिबाग येथे पार पडली. जिल्हा नियोनच्या सभागृहात पार पडलेल्या परिषदेला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्यासह उद्योग विभागाचे अधिकारी, औद्योगिक वसाहतींचे पदाधिकारी आणि विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उद्योजकांच्या विविध प्रशासकीय अडचणी तत्परतेने दूर करण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘उद्योग सेतू’ उपक्रमावर परिषदेत विशेष भर देण्यात आला. दर महिन्याच्या दुसर्या शुक्रवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत ऑनलाइन व्हीसीद्वारे उद्योजकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातात. अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. रायगडची औद्योगिक क्षमता दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात 2 लाखांहून अधिक सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांची नोंदणी झाली आहे.
जिल्ह्यात सध्या 9 एमआयडीसी, 3 सहकारी औद्योगिक वसाहती आणि 19 विशाल प्रकल्प कार्यरत आहेत. जेएसडब्ल्यू, टाटा स्टील आणि सुदर्शन केमिकल्स यांसह 200 हून अधिक मोठे उद्योग जिल्ह्याच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेला बळ देत आहेत. या उद्योगांच्या माध्यमातून सहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. रायगडने निर्यातीच्या क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. 2025-26 मध्ये जिल्ह्यातून 51 हजार 809 कोटी रुपयांची निर्यात झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात 21.27 टक्क्यांची वाढ झाली आहे.
रसायने, मांस, लोखंड-पोलाद, इलेक्ट्रॉनिक्स,रायगड जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 बुधवारी (19 ऑगस्ट) रोजी अलिबाग येथे पार पडली. जिल्हा नियोनच्या सभागृहात पार पडलेल्या परिषदेला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्यासह उद्योग विभागाचे अधिकारी, औद्योगिक वसाहतींचे पदाधिकारी आणि विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उद्योजकांच्या विविध प्रशासकीय अडचणी तत्परतेने दूर करण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘उद्योग सेतू’ उपक्रमावर परिषदेत विशेष भर देण्यात आला. दर महिन्याच्या दुसर्या शुक्रवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत ऑनलाइन व्हीसीद्वारे उद्योजकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातात. अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. रायगडची औद्योगिक क्षमता दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात 2 लाखांहून अधिक सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांची नोंदणी झाली आहे.
जिल्ह्यात सध्या 9 एमआयडीसी, 3 सहकारी औद्योगिक वसाहती आणि 19 विशाल प्रकल्प कार्यरत आहेत. जेएसडब्ल्यू, टाटा स्टील आणि सुदर्शन केमिकल्स यांसह 200 हून अधिक मोठे उद्योग जिल्ह्याच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेला बळ देत आहेत. या उद्योगांच्या माध्यमातून सहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. रायगडने निर्यातीच्या क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. 2025-26 मध्ये जिल्ह्यातून 51 हजार 809 कोटी रुपयांची निर्यात झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात 21.27 टक्क्यांची वाढ झाली आहे. रसायने, मांस, लोखंड-पोलाद, इलेक्ट्रॉनिक्स,