कुंभे घाट, धरण व धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी

By Raigad Times    02-Aug-2026
Total Views |
mangoan news
माणगाव | माणगाव तालुक्यातील कुंभे केळगण घाट, कुंभे धरण आणि कुंभे बोगदा परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
 
माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी हे आदेश लागू केले आहेत. पोलीस निरीक्षक माणगाव यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, कुंभे केळगण घाट, कुंभे धरण आणि कुंभे बोगदा ही ठिकाणे पुणे, मुंबई तसेच राज्यातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहेत.
 
पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र, कुंभे धरण व धबधबा परिसर हा नैसर्गिकदृष्ट्या दुर्गम भागात असून तेथे सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना उपलब्ध नाहीत. कुंभे घाटातील धोकादायक वळणे, तीव्र उतार आणि पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.