अलिबाग | अलिबाग समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटक महिलेला एका घोडागाडीने जोरदार धडक दिली. यात ती जखमी झाली आहे. याप्रकरणी चालक- मालकाविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे येथील रहिवाशी असलेली महिला रविवारी, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी अलिबाग समुद्र किनार्यावर फिरण्यासाठी आली होती. यावेळी एका घोडागाडी चालकाने बेदरकारपणे घोडे हाकल्याने घोडागाडीची धडक सदर महिलेला लागली. या अपघातात महिलेच्या डोक्याला, हाताला तसेच शरीराच्या इतर भागांना साध्या व गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या.
घटनेनंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी चालक- मालकाविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार वरसोलकर करीत आहेत.