अलिबाग | रायगड जिल्ह्यात रविवारी (५ जुलै) सकाळी ८.३० वाजेपर्यंत झालेल्या २४ तासांच्या पावसात सर्व तालुक्यांमध्ये मुसळधार पर्जन्याची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण ३४४७.२ मिमी पाऊस झाला असून, सरासरी २१५.४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात माथेरानमध्ये सर्वाधिक ४०८ मिमी पाऊस झाला. त्यापाठोपाठ कर्जत २९१ मिमी, पनवेल २८२.२ मिमी, खालापूर २७४ मिमी, पेण २६५ मिमी आणि मुरूड २५८ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय सुधागड २२२ मिमी, म्हसळा २१८ मिमी, अलिबाग १९६ मिमी, तळा १९२ मिमी, माणगाव १८८ मिमी, रोहा १७१ मिमी, उरण १४८ मिमी, महाड १२१ मिमी, पोलादपूर १११ मिमी आणि श्रीवर्धन १०२ मिमी पाऊस झाला. दरम्यान, रविवारी सकाळी आठ ते संध्यकाळी साडेपाच वाजेपर्यंत १२१९ मिमी पाऊस झाला. याची सरासरी ७६.२१ होती.