सायबर फसवणुकीसाठी बँक खाती दिल्याप्रकरणी रायगडात तीन गुन्हे दाखल

By Raigad Times    26-Jul-2026
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग | सायबर फसवणुकीसाठी म्यूल बँक खात्यांचा वापर केल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा आणि नागोठणे पोलीस ठाण्यांत स्वतंत्र तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
अलिबाग येथे एका आरोपीने बँक ऑफ इंडियामध्ये म्यूल बँक खाते उघडून कमिशनच्या मोबदल्यात ते इतरांना वापरण्यास दिले. रोहा न्हावे येथे एका आरोपीने स्वतःच्या नावावरील बँक खाते सायबर फसवणुकीतून प्राप्त झालेली रक्कम स्वीकारण्यासाठी जाणीवपूर्वक उपलब्ध करून दिले.
 
तर नागोठणे येथ्ज्ञे एकाने स्वतःच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्यूल खात्याचा वापर सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी खाते इतरांच्या वापरासाठी उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले आहे.