कुलाबा ढोल-ताशा ध्वज पथकाचे वाद्यपूजन व सरावाचा शुभारंभ

By Raigad Times    21-Jul-2026
Total Views |
 ALIBAG
 
अलिबाग | आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुलाबा ढोल-ताशा ध्वज पथक, अलिबाग यांच्यावतीने वाद्यपूजन व सराव शुभारंभ सोहळा १९ जुलै रोजी रामनाथ येथील शाळेच्या मैदानावर संपन्न झाला.
 
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सचिन राऊळ, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील दामले, अलिबाग नगरपालिकेचे नगरसेवक ऋषिकेश माळी, संतोष गुरव, अंकित बंगेरा यांच्यासह विविध मान्यवर, उपस्थित होते. कुलाबा ढोल-ताशा ध्वज पथकातील वादकांसह निमंत्रित मित्र पथकांच्या वादकांनी एकत्रितपणे ढोल- ताशांचे जोशपूर्ण वादन सादर केले.