महाडमध्ये मतदार यादी विशेष पुनरिक्षण करणार्‍या बीएलओ शिक्षिकेला धमकी

By Raigad Times    16-Jul-2026
Total Views |
mahad
 
महाड | महाड शहरातील मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेदरम्यान बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) शिक्षिकेला एका इसमाने धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी महाड शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
१२ जुलै रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास महाड नगरपालिकेच्या शाळा क्रमांक ४ मधील खोली क्रमांक २ येथे विशेष मतदार यादी पुनरिक्षणाचे काम सुरू होते. दासगाव येथील महिला शिक्षिका या तहसीलदारांच्या आदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून मतदार नोंदणी व पडताळणीचे शासकीय काम होत्या.
 
याचवेळी महाड येथील एक व्यक्ती तेथे आला. त्याच्या पत्नीचे नाव मतदार यादीत योग्यप्रकारे मॅपिंग झाले नसल्याच्या कारणावरून त्याने शिक्षिकेशी वाद घातल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधिताने लोकसेवक असलेल्या शिक्षिकेच्या अंगावर धावून जात धमकी दिली आणि सुरू असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
 
या घटनेनंतर महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत करीत आहेत. दरम्यान, मतदार यादी पुनरिक्षणासारख्या संवेदनशील प्रक्रियेदरम्यान लोकसेवकांच्या कामात अडथळा आणण्याच्या या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.