मारहाणीचा कर्जत नगरपरिषद कर्मचार्‍यांकडून निषेध

By Raigad Times    10-Jul-2026
Total Views |
karjat
 
कर्जत | महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनात जाऊन महाड नगरपरिषदेचे नगरसेवक सूरज बामणे व इतर साथीदारांनी हल्ला करून मारहाण केली होती.
 
नगरपरिषद कर्मचार्‍यांनी या घटनेचा जाहीर निषेध करून सर्व आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघटना यांच्यावतीने प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. या घटनेचा निषेध म्हणून कर्जत नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी काळ्या किती लावून या घटनेचा निषेध केला आहे.