श्रीवर्धनचे नगराध्यक्ष शिंदे गटात! अ‍ॅड.अतुल चौगुले, विजयराज खुळे यांचे एकनाथ शिंदेंकडून स्वागत

By Raigad Times    25-Jun-2026
Total Views |
mumbai
 
मुंबई | श्रीवर्धन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अ‍ॅड.अतुल चौगुले यांनी मंगळवारी आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजयराज खुळे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.
 
श्रीवर्धन नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड.अतुल चौगुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. काही काळ प्रतिक्षा केल्यानंतर अखेर त्यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विक्रांत राऊत, साकार जाधव, प्रितम श्रीवर्धनकर, लखन भाटकर, पायल भाटकर, मयुरेश मयेकर, प्रतिक पालवे, नियती जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
 
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, उपाध्यक्ष अजितकुमार पिसाळ, माजी नगरसेविका भारती पिसाळ, उपाध्यक्ष हनुमंत ठाकूर, हिराजी निंबाळकर, शर्मिला पवार, वॉर्ड अध्यक्ष ज्योती पुजारी, कल्याणी बोंद्रे, युवक अध्यक्ष अनिल पुजारी, जितेंद्र खोत तसेच अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष ऑस्कर किणी यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, माजी महापौर दत्ता दळवी, उपनेत्या सुवर्णा करंजे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.