किल्ले रायगड पायरी मार्ग दोन दिवस बंद

By Raigad Times    25-Jun-2026
Total Views |
raigad
 
अलिबाग | किल्ले रायगडावरील पायरी मार्गावर दरड कोसळल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने २४ व २५ जून या दोन दिवसांसाठी पायरी मार्ग बंद ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जारी केले आहेत.
 
२३ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील पायरी मार्गावरील महादरवाजा परिसरात दरड कोसळली. त्यामुळे पायरी मार्गाने गडावर जाणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
संबंधित विभागाकडून दरड हटविण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले असून काम पूर्ण होईपर्यंत हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तहसीलदार महाड यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पायरी मार्ग २४ व २५ जून रोजी बंद ठेवण्याची विनंती केली होती.