अनिकेत तटकरे यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

By Raigad Times    24-Jun-2026
Total Views |
 mumbai
 
मुंबई | विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य अनिकेत तटकरे यांच्यासह अन्य सदस्यानी सभागृहात सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, उपस्थित होते.
 
नवनिर्वाचित सदस्य प्राजक्त प्रसादराव तनपुरे, रवींद्र सदाशिव फाटक, दुष्यंत सतीश चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज माधवराव पाटील, प्रवीण रामचंद्र पोटे-पाटील, अमरनाथ अनंतराव राजूरकर, राजेंद्र विठ्ठल राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ. राजीव पोतदार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी शपथ घेतली.